कुपवाड / प्रतिनिधी

कुपवाड ता.१३ : औधोगिक वसाहतीत फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन आणि कृष्णा व्हॅली चेंबर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (ता.१७) रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत आंतराष्ट्रीय व्यवसायात प्रवेश करण्याचे नवीन मार्ग आणि साधने या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
जर तुम्ही तुमचा व्यवसाय जागतिक स्तरावर वाढवण्याचा विचार करत आहात ? तुम्ही, छोटा-मोठा किंवा मध्यम स्वरूपाचा व्यवसाय करीत असलात तरीही, तुम्हाला स्थिर ग्राहक बेसच्या पलीकडे पाऊल टाकण्यासाठी एक झेप आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी एक धोरणात्मक आंतरराष्ट्रीय व्यवसाय कल्पना तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी कृष्णा व्हॅली चेंबरने कार्यशाळा आयोजित केलेली आहे.

कार्यशाळेसाठी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. https://forms.office.com/r/p7jpfsK7zi
या लिंकवर रजिस्ट्रेशन करावे. तरी या कार्यशाळेचा जास्तीत जास्त उद्योजकांनी फायदा घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सतीश मालू यांनी केले आहे.