सांगली : प्रतिनिधी

सांगली, ता.२५ : सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे सर्व विभागाच्या कामकाजाची आढावा बैठक (ता.२४) पार पडली. या बैठकीस
सांगली ही चांगली व्हायला पाहिजे. यासाठी सर्वांनी मिळून काम करूया आणि महापालिका प्रशासनाला साथ देऊया असे आवाहन सदर बैठकीत करण्यात आले.
यावेळी प्रभाग स्तरावर खाऊ गल्ली आणि भाजीपाला विक्री केंद्र उभं राहावेत. शहरात महिलांसाठी जास्तीत जास्त स्वच्छतागृह उभारावेत, अपूर्ण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावे आणि नागरिकांच्या तक्रारींच्या तात्काळ निवारण व्हावे. अशा अनेक विषयांबाबत चर्चा केली यावेळी आयुक्त शुभम गुप्ता, माजी आमदार दिनकर तात्या पाटील,अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख, उपायुक्त वैभव साबळे यांच्यासह सर्व विभागांचे खाते प्रमुख उपस्थित होते.