मिरज : प्रतिनिधी

मिरज ता.५ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला सांगली शहरजिल्हा अध्यक्षा आणि प्रभाग क्र २० च्या माजी नगरसेविका सौ संगीता अभिजित हारगे यांच्यावतीने हळदी कुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास प्रभाग २० या परिसरातील सर्व हिंदू-मुस्लिम व सर्व जाती धर्माच्या महिलांनी अलोट गर्दी करून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे माजी नगरसेविका सौ. संगीता हारगे यांच्याकडून कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळी दिव्यांग महिला आणि विधवा महिलांना सहभागी करून हळदी-कुंकवाचा मान दिला जातो. या कार्यक्रमाला जवळपास ३००० ते ३५०० महिलांनी सहभाग घेतला. म्हैशाळच्या माजी सरपंच सौ मनोरमादेवी शिंदे, माजी नगरसेविका सौ पवित्रा केरीपाळे, माजी नगरसेविका सौ गायत्री कुल्लोळी, माजी नगरसेविका सौ प्रार्थना मदभावीकर, माजी नगरसेविका सौ बबिता मेंढे, माजी नगरसेविका सौ अनिता व्हनखंडे, सौ सुवर्णा कोकणे, सौ सातपुते वहिनी, श्रीमती चंद्रिका कांबळे, महिला मिरज शहर अध्यक्ष सौ शारदा माळी, महिला कुपवाड शहर अध्यक्ष सौ प्रियांका विचारे, सांगली शहर कार्याअध्यक्ष श्रीमती स्वाती शिरूर, महीला सांगली शहर माजी अध्यक्ष सौ अनिता पांगम, शिवसेना महिला शहर जिल्हा संघटक श्रीमती रुक्मिणी अंबिगेर,महिला सरचिटणीस सौ शितल सोनवणे,युवती शहर जिल्हाअध्यक्ष मा अमृता चोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे नियोजन महिला जिल्हा सदस्य सौ अरुणा कांबळे, सौ रूपाली वांडरे,सौ गीता कोरे,सौ वैशाली चौगुले,सौ दिपाली हारगे,सौ नागरत्ना हादीमणी,सौ शिवलीला हारगे,सौ गीतांजली पाटील,सौ सुचिता सातपुते,सौ अस्मिता हारगे,सौ अनिता पाटील,सौ अनिता मिरजे,सौ अंकिता नेर्लेकर,सौ शुभांगी कोरे,सौ सीमा शिंदे,सौ अमृता हारगे,सौ रूपाली हारगे,सौ श्रेया मंगावते, सौ राजश्री नेर्लेकर यांनी केले.
यावेळी माजी नगरसेवक आरोग्य दूत मा. आय्युब भाई बारगिर, मा. विजय दादा माळी, मा. आण्णासो हारगे, मा. राजेंद्र नर्लेकर, मा. आकाश कांबळे, मा. संदीप शिंदे, मा. आणासो तेरदाळे, मा सत्तू कोरे, मा. महेश बसरगे, मा. शहाजी पवार, मा. रमेश बसरगे, मा. श्रीकांत मंगावते, मा. सुनील कोरे, मा. सुहास हवालदार, मा. अनिल कोरे, मा. सौरव ताशिलदार, मा. मुखत्यार कुरणे यांच्या सह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
