
सांगली ता.७ : त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. जगन्नाथ दादा ठोकळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगली येथील रमाई आंबेडकर उद्यानात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे व रमाई आंबेडकर उद्यान देखभाल व संरक्षण समितीच्या अध्यक्षा आशाताई साबळे, छाया कांबळे, अमिता कांबळे, सौ.संगिता उबाळे, यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. बौध्दाचार्य हणमंत साबळे यांनी सूत्रसंचालन केले.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मार्फत घेण्यात आलेल्या २०२४ च्या परिक्षेत Msc(statistics)विषयात टाॅप १० मध्ये शिवाय मागासवर्गीय विभागात प्रथम क्रमांक पटकावून दैदीप्यमान यश संपादन केल्यामुळे प्रा.सोना सुरेश आठवले यांचा तसेच जेष्ठ नेते शहाजी मोरे यांचे नातु चि.सम्यंक अमोल मोरे या विद्यार्थ्यांने चित्रकलेमध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी करुन पदक प्राप्त केलेने दोघांचाही सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. यावेळी अजय उबाळे यांचेकडून लाडू वाटप करण्यात आले.
यावेळी शिवाजी वाघमारे, शहाजी मोरे, अजय उबाळे, संजय शिंदे, मनोज उर्फ आशिष गाडे, अरुण आठवले, बापूसाहेब ठोकळे, सचिन ऐवळे, अविनाश कांबळे, जितेंद्र बनसोडे, हरिभाऊ सवणे, रमेश सावंत, सुशांत कांबळे, मच्छिंद्र माने, संतोष कांबळे, राहूल शिंदे, बाळासाहेब शिंदे, गजानन गस्ते, नितीन साबळे, जगदीश पाटील, विराज शिंदे, राजू वडर, विनोद साबळे, गणपती चवडीकर, अनिल साबळे, कु.मोनाली वाघमारे, निकिता कांबळे, नितीन कांबळे, जाफर रंगारी यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते