
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 11 मतदारसंघात निवडणूक सुरु आहे. त्यात दुपारी 3 पर्यंत राज्यात 42.35 टक्के मतदान झाले. राज्यातील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या लोकसभा मतदासंघात सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 42.35 टक्के मतदान लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 42.35 टक्के मतदान झाले. नंदुरबार – 49.91 टक्के, जळगाव 42.15 टक्के, रावेर 45.26 टक्के, जालना – 47.51 टक्के, औरंगाबाद – 43.76 टक्के, मावळ 36.54 टक्के, पुणे 35.61 टक्के, शिरूर – 36.43 टक्के, अहमदनगर- 41.35 टक्के, शिर्डी- 44.87 टक्के, बीड 46.49 टक्के मतदान झाले.