
कुपवाड, ता.१९ : कुपवाड MIDC मध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने दोन दुचाकींना दिली धडक, धडकेत तिघेजण जखमी झालेची घटना आज सकाळी साडे आकराच्या सुमारास घडली आहे. या धडकेत जखमी झालेल्या तिघांची नावे नामदेव नरसु माळी, वय ६९ वर्ष, राहणार स्वामी मळा कुपवाड २) शहाबाद अशा पाक लाडखान राहणार सत्यसाई नगर पोलीस लाईन पाठीमागे कुपवाड व त्यांचा पाठीमागे बसलेला ३) जैद रफिक शेख वय २१ वर्षे राहणार आलिशान कॉलनी कुपवाड असे आहे. सदर घटनेची कुपवाड पोलीसांत नोंद झाली असून चारचाकी चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केलेल्या संशयित आरोपीचे नाव प्रतीक अरुण जगताप राहणार सुंदर नगर मिरज जिल्हा सांगली असे आहे. याबाबत समित नामदेव माळी वय ३५ वर्षे धंदा सूर्या इंडस्ट्रीज येथे सुपरवायझर राहणार स्वामी मळा कुपवाड, यांनी पोलीसांत फिर्याद दिलेली आहे.
मिळालेले अधिक माहिती अशी की, बुधवार (ता.१९) सकाळी साडे आकाराच्या सुमारास MH 10 DV 0800 या चारचाकी चालकाने भरधाव वेगाने चारचाकी चालवत गाडी क्रमांक MH 07 A 68 34 या दुचाकीवरून येणाऱ्या नामदेव माळीला समोरून जोराची धडक देऊन त्याला गंभीर जखमी करून पुढे निघून गेला व पुढे जाऊन दुचाकी गाडी नंबर MH 10 EH 0777 सुजुकी बर्मन वरील चालक शहाबाज त्यांच्या पाठीमागे बसलेला जैद शेख यांचे गाडीस धडक देऊन दोघांना जखमी करून अपघाताची खबर न देता निघून गेल्याने त्याच्यावर कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल केला. सपोनी भांडवलकर सो यांचे आदेशाने पुढील तपास सपोफौ सनदी यांचे कडे दिला आहे.