
कुपवाड, ता. १९ : शहराचे ग्रामदैवत हिंदू-मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान व ऐक्याचे प्रतीक सुफी संत हजरत लाडले मशायक (र.अ.) यांच्या ६८९ वा उरूस, गुरुवार (ता.२०) कुपवाडमध्ये उरुसाची सुरवात भक्तिभावाने, धार्मिक विधीने होत आहे, अशी माहिती दर्गा सरपंच आयनुद्दीन मुजावर यांनी दिली. शुक्रवारी (२१) दिल्लीचे नामवंत कव्वाल वसीम साबरी यांचा कव्वालीचा कार्यक्रम दर्गा पटांगणात होणार आहे.