खटाव : वार्ताहर

खटाव, ता.६ : मिरज तालुक्यातील खटाव गावातील जिल्हा परिषद शाळा पंचवर्णवाडी (खटाव) या शाळेचे सोमवार (ता.३) मार्च रोजीवार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडले.
खटाव गावापासून सुमारे तीन किलोमीटर आत पंचवर्णवाडी मळ्यात असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये भारुड, नाटिका, एकांकिका, कोळीगीत, देशभक्तीपर गीते, बालगीते व रेकॉर्ड डान्स असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. खटावच्या इतर शाळेच्या शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी व शाळा व्यवस्थापन समितीनी आदर्श घेण्याची गरज आहे .
या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य श्री संजय कागवाडे स्नेहसंमेलनाचे अध्यक्षस्थानी होते . तसेच श्री संभाजी पारोजी, श्री सांगाप्पा पाटील, हे ग्रामपंचायत सदस्यही आवर्जुन उपस्थित होते. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सुरेश परीट, शिक्षणप्रेमी श्री. गिरीशआण्णा तेलसंग, सर्व पालकवर्ग , शिक्षक आणि परिसरातील पालकांनीही सहकार्य केले.
यावेळी कार्यक्रमासाठी केंद्र मुख्याध्यापक मा. मोरे सर, लिंगनूर शाळेचे मुख्याध्यापक श्री हणमंत आरगे सर, आमचे पत्रकार मित्र श्री प्रविण जगताप सर, शिक्षक बँक संचालक मिलन नागणे सर, आपल्या विशिष्ट शैलीमध्ये सूत्रसंचालन जबाबदारी सांभाळणारे मा. रघुवीर अथणीकर सर, अनिल मोहिते सर, सुनिल मगदूम सर, परशराम जाधव सर, आकाश जाधव सर, सदाशिव नाईक सर व अशोक टकळके सर या सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहून मुलांना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षपदावरून बोलताना ग्रामपंचायत सदस्य मा. संजय कागवाडे यांनी शाळेसाठी ढोल आणि झांज देण्याचे घोषित केले. संपूर्ण कार्यक्रम भोसले सर व सावन कुरणे कोरिओग्राफर यांनी केले तर मगदूम सर यांनी तंत्रस्नेही चे काम पार पाडले तसेच कार्यक्रमास जगदीश भोसले व पंकज भगत यांनी डॉल्बी सेट व मंडप अत्यल्प दरात उपलब्ध करून दिला. या कार्यक्रमास प्रथमेश बाबर, रमेश बाबर, संजय बाबर यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच मेकअप व ड्रेस चे काम नम्रता हुरणगे व पूजा खटावकर यांनी छान पार पाडले. शेवटी शोभाताई बाबर यांनी सर्वांसाठी चविष्ट भडंग बनवून दिला. सदरच्या कार्यक्रमात 25 गीत प्रकार साजरे करण्यात आले. हा कार्यक्रम जवळजवळ तीन तास चालला होता. उपस्थित सर्व पालक सर्व मान्यवर यांनी मुलांच्या कलागुणांची कदर करून भरघोस बक्षीसे दिली. मुख्याध्यापक भोसले सर यांनी सर्वांचे आभार मानले.