
मिरज, ता.८ : महिला दिनानिमित्त ऋतुजा योग प्रशिक्षण केंद्राच्या वतीने महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास डॉ. भारती चौगुले व श्रीमती जयदेवी चौगुले यांनी महिलांच्या विविध समस्या व आरोग्य विषयक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन ऋतुजा योग प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका सौ. ऋतुजा सातपुते यांनी केले होते.
आजच्या कुटुंब सांभाळून विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळत असतात त्यामुळे महिलांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहणे गरजेचे असून यासाठी योगसाधना हा उत्तम पर्याय असल्याचे सर्व मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
ऋतुजा योग प्रशिक्षण केंद्राच्या वतीने अत्यंत माफक फी मधे योग प्रशिक्षण केंद्र चालविले जात असल्याचे कौतुक प्रमुख पाहुण्यांनी केले. कार्यक्रमाचे स्वागत, प्रस्ताविक सौ. ऋतुजा सातपुते यांनी केले तर सूत्रसंचालन श्री. विजय सातपुते यांनी केले.
श्रीमती. ज्योती शितोळे, श्रीमती अस्मिता केरीपाळे, श्रीमती गायत्री गवळी, श्रीमती सिंधू सातपुते, श्रीमती अलका कदम, श्रीमती गायत्री कदम यांचे या कार्यक्रमास सहकार्य लाभले तर या कार्यक्रमाचे आभार कुमारी जान्हवी सातपुते हिने मानले. या कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.