
कुपवाड – सावळी येथील एन.डी. माऊली एच.पी गॅस एजन्सी याठिकाणी अवैध्यरित्या घरगुती सिलेंडर मधुन व्यवसायीक सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याची माहिती मिळताच कुपवाड औद्योगिक पोलिसांनी छापा टाकत सुमारे साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सदर एजन्सीमध्ये 3 व्यक्ती सुरक्षिततेचे कोणतेही भान न ठेवता, स्वतः चे व लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल, अशा पध्दतीने गॅस भरणा करताना रंगेहात पकडणेत आले. 1) चंद्रकांत संभाजी कोळेकर (वय 36) रा सह्याद्री नगर, सांगली 2) मनोज कुमार जबराराम (वय 20) रा एचपी गॅस गोडाऊन शेजारी, सावळी 3) रेवनकुमार सुरेंद्र महाजन (वय 29) रा वसंत कॉलनी, प्लॉट 2, सांगली व अल्पवयीन युवक यांना कुपवाड औद्योगिक पोलिसांनी अटक केली आहे. सदर घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाडवे करीत आहेत.