बामणोली दत्तनगर चौकात एका तरुणावर हल्ला

दत्तनगर : दि. 7/08/2024 रोजी
बामणोली दत्तनगर चौकात सायंकाळी साडेपाच ते सातच्या दरम्यान शिवीगाळ केलेल्या कारणावरून विकास टाक वय वर्ष 24 या तरुणावर दगड आणि धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला.
याप्रकरणी कुपवाड पोलिसांत आदित्य तिनगोटे वय वर्ष 21 रा.दत्तनगर , सूरज उर्फ ( सोन्या ) मुळवाड वय वर्ष 27 रा.दत्तनगर , प्रथमेश पाटोळे वय वर्ष 20 रा.दत्तनगर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची फिर्याद जखमी विकासच्या आई पूनम रुपसिंग टाक वय वर्ष 40 रा.यलम्मा मंदिर जवळ, लाडले मशायक कॉलनी कुपवाड यांनी दिली आहे . कुपवाड पोलिसांनी दि. 8 ऑगस्टला आदित्य तिनगोटे व सुरज मुळवाड या दोघां संशयितांना ताब्यात घेतले असून त्यातील एक संशयित प्रथमेश पाटोळे हा फरार आहे.सदर घटनेचा अधीक तपास कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक दिपक भांडवलकर यांच्या सुचनेने पोहेकॉ.भोसले हे करीत आहेत.