वसंतदादाच्या समाधीवर शपथ घेऊन आलोय मी; सांगलीत काँग्रेस संपू देणार नाही-पृथ्वीराज पाटील

सांगली : सोमवार दि. ४/११/२०१४ महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की; सांगली विधानसभा मतदार संघात गेली पंधरा वर्षे काँग्रेसचा आमदार नाही. हे चित्र बदलायला काँग्रेस विचाराचे मतदार सुज्ञ आहेत. मी वसंतदादाच्या समाधीवर शपथ घेऊन आलोय मी सांगलीत काँग्रेस संपू देणार नाही. काल सांयकाळी कृष्णा नदीकाठावर वसंतदादांच्या समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले दहा वर्षापुर्वी माझ्याकडे कॉग्रेसचा पदाधिकारी म्हणून जबाबदारी आली तेव्हा काँग्रेसचा कठीण काळ सुरु झाला होता. त्यावेळी वसंतदादाच्या विचाराने वाढलेली कॉग्रेस पुढे न्यायची हाच निर्धार होता. चहूबाजूने संकट असताना भाजपकडून सुडाचे राजकारण होत असताना त्याविरोधात उभे राहिलो.

काँग्रेस विचाराचा प्रत्येक कार्यकर्ता ताकदीने लढला तो कोणत्याही आमिषाला बळी पडला नाही. दहा वर्षे काँग्रेससाठी सर्वमिळून झटले आज समज गैरसमजातून जे काही घडले आहे त्यावर नक्की फेरविचार होईल. काँग्रेस एकसंघ राहील असा मला अजूनही विश्वास आहे. आमचे नेते डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांची पुर्ण ताकद सोबतीला आहे.

मी दादाच्या समाधीवर शपथ घेऊन आलोय जिंकल्यानतर आधी दादांच्या समाधीवर डोके ठेवेन आणि मगच गुलाल उधळेन ते म्हणाले कॉग्रेसमध्ये फूट पडली असे समजून भाजप खुष होत असेल तर त्यांनी स्वप्नातून बाहेर यावे त्यांनी दहा वर्षे सांगली खड्यात घातली कार्पोरेट राजकारण केले राज्यात सत्ता असताना त्यांना सांगलीत बदल घडवता आला नाही तो घडवायचा असेल तर बदल घडला पाहीजे.

पृथ्वीराज पाटील महाविकास आगाडीचे सांगली विधानसभाचे उमेदवार.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button