
सांगली विधानसभा निवडणुक २०२४ आज भाजपा बंडखोर अपक्ष उमेदवार शिवाजी डोंगरे यांनी आपला अपक्ष उमेदवार अर्ज माघे घेतला. आजअखेर पर्यंत शिवाजी डोंगरे हे विधानसभा लढवण्यास ठाम होते. भाजप पक्षश्रेष्ठीचा चर्चेनंतर त्यांनी शेवटच्या क्षणी माघार घेण्याचा निर्णय घेतला . शिवाजी डोंगरे यांचा माघार मुळे भाजप पक्षाचे सुधीर दादा गाडगीळ यांच्या पक्षांअंतर्गत समस्या संपल्या व महायुतीकडून सुधीर दादा गाडगीळ यांचे बळ वाढले.
दुसरीकडे काँग्रेस जेष्ठ नेत्या अपक्ष उमेदवार यांनी आपला अर्ज कायम करत निवडणूक लढण्यास ठाम राहिल्या, काँग्रेस पक्षश्रेष्ठीनी त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केला तरी त्या कोणाचेही न ऐकता त्या आपल्या मताशी ठाम राहिल्या व निवडणूक लढण्यास सज्ज झाल्या आहेत. जयश्रीताई पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे काँग्रेसपक्षाची डोकेदुखी वाढली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांना जयश्रीताई यांच्या उमेदवारीमुळे अडचणी व समस्या वाढल्या आहेत.
सांगली विधानसभा २०२४ निवडणूक लढत ही तिरंगी लढत होणार. सांगलीचे आमदार कोण होणार ? सांगली विधानसभा कोण बाजी मारणार?