मिरज | प्रतिनिधी

बेडग ता. ६ : येथे आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन प्रेरणा मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी बेडग गावचे ग्रामपंचायत माजी सदस्य मा प्रकाश तथा नाना वाळेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वल करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच ज्येष्ठ वकील व संस्थेच्या मार्गदर्शक एडवोकेट राजेंद्र कुमार सोनावळे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रणजीत मोहन कांबळे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे विद्यमान संचालक कैलास संभाजी कांबळे यांनी केले.
यावेळी नरवाड गावचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गोविंद सपकाळ व बेडग गावचे सिद्राम तांदळे, निलेश उत्तम कांबळे, विकास संजय असादे, साहिल कांबळे, कैलास भोसले, सचिन शिंदे संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण गोपाळ सरोदे, कोळी, राधा कांबळे व परिसरातील बहुसंख्य लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आला व महामानवास अभिवादन करण्यात आले.