मिरज | प्रतिनिधी

बोलवाड सोमवार ता. १६ : येथील माजी लोकनियुक्त सरपंच व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मा.सुहास (दादा) पाटील यांनी मिरज पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता फरमान अली यांना बोलावून घेऊन बोलवाड गावातील जल जीवन पाइपलाइन कामाची पाहणी केली.
सध्यस्थितीत टाकीचे काम पूर्ण आहे, फिल्टर काम चालू आहे. नदीपासून मेन लाईन ९५% पाईपलाईन पूर्ण झालेली आहे. रेल्वे क्रॉसिंग, वीज कनेक्शन अशा काही तांत्रिक अडचणीमुळे गावात पाणी येण्यास विलंब होत आहे. उर्वरित काम ठेकेदाराने लवकरात लवकर पूर्ण करून एक दोन महिन्यांमध्ये बोलवाड गावात पाणी आणण्याचे सुहास दादा पाटील यांना आश्वासन दिले.
यावेळी बोलवाड गावचे लोकनियुक्त सरपंच सौ.निगार शेख, विद्यमान उपसरपंच सचिन (दादा) कांबळे, मा.उपसरपंच व ग्रा.पं.सदस्य भाऊसो नरगच्चे, मा.उपसरपंच व ग्रा.पं.सदस्य अजित कांबळे सर, माजी सरपंच पिंटू नाईक, दादा पाटील, बकाश हवालदार आदी उपस्थित होते.