कुपवाड | प्रतिनिधी

सांगली : शनिवार (ता.१४) माधवनगर येथील मारुती मंदिराची विटंबना केल्याप्रकरणी आज ता.१७ रोजी कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक दिपक भांडवलकर यांना सकल हिंदू समाज महाराष्ट्र संघटना व सर्वपक्षीय यांच्यावतीने निवेदन दिले. या निवेदनात चार मागण्या करणयात आलेल्या आहेत त्या खालीलप्रमाणे
- १) या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी आणि कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करावेत.
- २) अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मंदिर आणि अन्य धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी विशेष पावले उचलावी.
- ३) समाजात शांतता राखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात.
- ४) या प्रकरणातील दोषींना अटक करण्यासाठी आणि न्यायालयीन प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा.
हिंदू समाजाच्या धार्मिक भावना आणि श्रद्धास्थानांचे संरक्षण ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पुढे बोलताना सकल हिंदू समाजचे विनायक एडके म्हणाले की, हनुमंताची विटंबना करून ज्यांनी हे दृष्यकृत्य केलेले आहे, त्यास त्वरित अटक व्हावी. ही घटना घडून ४८ तास ओलंडून गेलेली आहेत आजून दोषी इसमास अटक झाली नाही. जर येत्या आठ दिवसात दोषींस अटक न झाल्यास सांगली जिल्ह्यात तीव्र आंदोलन करणार व एसपी ऑफिसच्या समोर सकल हिंदू समाजाच्या वतीने आमरण उपोषण करण्याचे इशारा केला आहे.
या प्रकरणात तत्काळ आणि कठोर पावले उचलावीत, अशी नम्र विनंती सकल हिंदू समाज महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आली. यावर कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिपक भांडवलकर यांनी लवकरात लवकर दोषींना ताब्यात घेऊन त्यांचावर योग्य कारवाई करण्याचे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर करडे, भाजपा शहर अध्यक्ष मनजीत पाटील, निलेश हिंगमिरे, भाजपा कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुभाष गडदे, शिवप्रतिष्ठानचे प्रदीप बाफना, सकल हिंदू समाजाचे विनायक एडके, जनसुराज्यचे आकाश गोसावी, बजरंग दल (सांगली) चे आकाश जाधव, सागर खंडागळे, संतोष सूर्यवंशी, ऋषिकेश जाधव, सूरज बंदाळ, अक्षय साळगोळ यांच्यासहित पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.