विशेष प्रतिनिधी

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार विधानपरिषदेच्या सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज ता.१७ रोजी जाहीर केला. यासाठी २९ डिसेंबर २०२४ रोजी मतदान होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सभापती पद रिक्त झाले होते. या पदासाठी १८ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी १८ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर त्या अर्जांची छाननी होणार असल्याचे श्रीमती गोऱ्हे यांनी यावेळी जाहीर केले.