कुपवाड | प्रतिनिधी

कुपवाड ता.१८ : प्रकाशनगर येथे धनाजी बापू कुंभार यांनी राहत्या घरी गळपास लावून आत्महत्या केलेची घटना घडली. याबाबत ऋषीकेश धनाजी कुंभार वय २४ वर्ष, व्यवसाय खासगी नोकरी रा. प्रकाशनगर, कुपवाड यांनी कुपवाड पोलिसांत फिर्याद दिली असुन फिर्यादी मयत धनाजी कुंभारचा मुलगा आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार कुपवाड येथील प्रकाशनगर गल्ली नं.११, नागोबा मंदिराजवळ, कुपवाड या ठिकाणी आज सकाळी आठ ते साडे दहाच्या दरम्यान धनाजी बापू कुंभार वय ५८ वर्ष यांनी त्यांच्या राहत्या घरी पत्राच्या खोलीतील छतास असलेल्या लाकडी वास्याला दोरीने गळपास लावून आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनास पाठविण्यात आले. याबाबत कुपवाड पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून अधिकतपास कुपवाड पोलीस करीत आहे.