कुपवाड | प्रतिनिधी

कुपवाड ता.२४ : उमेदनगर परिसरातील घरफोडीच्या गुन्हा कुपवाड पोलिसांनी उघडकीस आणला. काही दिवसांपूर्वी कुपवाडमधील उमेदनगर अनिता युवराज शिंदे (रा. सूतगिरणी चौक उमेदनगर, कुपवाड) यांच्या घरातून दीड लाख रुपयांचे सोन्याचे ऐवज चोरीला गेले होते. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी आकाश सतीश कवठेकर या संसयितास अटक करून त्याच्या कब्जातील दीड लाख रुपयांचा चार तोळ्यांचा सोन्याचा ऐवज हस्तगत केले. कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक दिपक भांडवलकर यांनी न्यायालइन प्रक्रिया पूर्ण करून सोन्याचा ऐवज सोमवार (ता.२३) फिर्यादी अनिता शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. सदर घटनेची फिर्याद अनिता शिंदे यांनी दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी उमेदनगर परिसरातील अनिता शिंदे यांच्या घरामध्ये घरफोडी झाली होती. या घरफोडीत चार तोळ्यांचे सोन्याचा ऐवज चोरीला गेले होते. सदर घटनेची तक्रार कुपवाड पोलिसांत दिली होती. दिलेल्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने सहा.पोलिस निरीक्षक दिपक भांडवलकर यांनी आदेशीत केले. पोलिसांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, त्याच परिसरातिल सराईत आकाश कवठेकर चोरीचे सोने विक्री करण्यासाठी येणार असल्याची. त्या महितीने कुपवाड पोलिसांनी सूतगिरणी चौकात सापळा रचून दुचाकिवरून येणारा इसम संशयास्पद वाटल्याने त्याला आडवून त्याची अंगझडती केली असता, त्याचेकडे सोन्याचे ऐवज वेडन, अंगट्या आढळून आले. त्याच्या कब्जातिल मुद्देमाल हस्तगत केले. त्याला ताब्यात घेऊन त्याची पोलीस ठाण्यात अधिक चौकशी केली असता त्याने हे ऐवज अनिता शिंदे यांच्या घरातून चोरल्याचे कबुली दिली.