
सांगली, ता.२६ : लॉयन सुपर किंग्ज अमीन टायर चषकचा मानकरी. सांगली येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर गुरुवार (ता.५) पासून सुरु असलेल्या अमीन टायर लिग स्पर्धा ची सांगता रविवार (ता.२२) झाली. सुमारे ८० ते ९० खेळाडूनी ऑक्शन द्वारे स्पर्धेत भाग घेतला. रविवार झालेल्या अंतीम फायनल मॅच मध्ये लॉयन सुपर किग्ज ने सात षटकात ७७ धावाचे आव्हान ठेवले. त्याला पि एन जे संघाने प्रत्युरात ७६ धावाच केल्या अंत्यत रोमहर्षक सामन्यात १ धावेने निसटता विजय प्राप्त करून लॉयन सुपर विजेते पद पटकावले. तर स्पर्धेचे दुसऱ्या क्रमांकाचे पी एन जे संघाने मिळवला.

या अंतीम सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’ व सिरीज अदित्य मालु ने फटकावल तर बेस्ट बॅटसमन अनुप उत्कृष गोलदांज, मुकेश माळी, बेस्ट फिल्डर सागर चावरे यांना मिळाले. या लीगचे प्रमुख पाहुणे म्हणुन सांगली पोलीस दलातील श्री कुमार पाटील, अझर पिरजादे, अमीत परीट यांची उपस्थिती होती. पाहुण्यांचे हस्ते बक्षीस समारंभ पार पडला.
यावेळी सर्व क्रिडाप्रेमी, खेळाडु सामना समीतीचे अजु महात, जाफर मोमीन, सरफराज इनामदार, एजाज मेस्त्री, विद्या पाटील, विशाल तुपे, अमीत राऊत यांनी परीश्रम घेतले. शेवट समारोप व आभार बाळु भाई धावडे यांनी मानले.