
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी अनिल देशमुख यांना पुष्पगुच्छ देवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजित कार्यक्रमात अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत मोठा गौप्यस्फोट केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री होते. पण त्यांच्यावर तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी कथित 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना एकवर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावं लागलं. याशिवाय अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने कठोर कारवाई केली. या सर्व घडामोडींनंतर अनिल देशमुख यांना काही महिन्यांपूर्वी जामीन मंजूर झालाय. आपल्या कोणत्या परिस्थितीत जावं लागलं, तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यासाशी समझौता करण्यासाठी माणूस पाठवला होता, असा मोठा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला.