सांगली / प्रतिनिधी

सांगली बुधवार ता.८ रोजी सांगली शहरात घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केले. अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आकाश सतीश कवठेकर वय २७ वर्ष, रा. उमेदनगर सूतगिरणी जवळ, कुपवाड, सांगली असे असून त्याच्याकडून २ लाख २७ हजार ४०० रुपये किंमतीचे चांदीचे दागिने व भांडी, रोख रक्कम ३०० रुपये, १ हजार रुपये किंमतीची तांब्याची भांडी, १५० रुपये किंमतीची एक लोखंडी कटावणी व सॅक, ३ हजार रुपये किंमतीचा रेडमीचा मोबाईल आणि ७० हजार किंमतीची हिरो होंडा कंपनीची एक दुचाकी असा हा एकूण तीन लाख एक हजार आठशे पन्नास रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत केदारनाथ विठ्ठल कुलकर्णी, रा. जैन बस्ती कुपवाड रोड, सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली. पोलीस अधीक्षक संदिप गुघे यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघसकीस आणण्याचे आदेशीत केले. त्या अनुषंगाने स्था.गु.अ शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहा.पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे पथकाची नियुक्ती केली. पथकातील पोलीस दरिबा बंडगर व सतिश माने यांना बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी आकाश कवठेकर, रा. कुपवाड हा चोरीचे दागिने विक्रीसाठी कुपवाड येथील सुतगिरणी चौक, परिसरात मोटार सायकलीवरून फिरत असल्याची मिळालेल्या बातमीने सुतगिरणी चौक, परिसरात सापळा रचून सराईत आरोपीस ताब्यात घेतले. त्याची अंगझडती केली असता त्याचा सॅकमध्ये चांदिचे दागिने व भांडी, तांब्याची भांडी, मोबाईल, कटावणी व रोख रक्कम मिळून आली. अधिकविचारपुस केली असता सदरचा मुद्देमाल हा पार्श्वनाथनगर, जैन बस्ती, कुपवाड रोड, सांगली येथील बंगल्यामध्ये चोरी केलेला असल्याची कबुली दिली. पुढील तपासकामी आरोपी व मुद्देमाल संजयनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. आकाश कवठेकर हा सराईत आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर, कुपवाड एम.आय.डी.सी पोलीस ठाणे या ठिकाणी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत.
सदर कारवाई सपोनि / पंकज पवार, दरिबा बंडगर, सतिश माने, महादेव नागणे, अनिल कोळेकर, सागर लवटे, संदिप गुरव, नागेश खरात, अमर नरळे, मच्छिंद्र बर्डे, सागर टिंगरे, संदिप नलावडे, उदयसिंह माळी, विक्रम खोत, कॅप्टन गुंडवाडे, विवेक साळुंखे, विजय पाटणकर सायबर पोलीस आदीने केली.