
बुधगावमध्ये ‘द’ journalist असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकारदिन साजरा करण्यात आला. ६ जानेवारी मराठी पत्रकार दिनानिमित्त ‘द’ journalist असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघटना पश्चिम महाराष्ट्रराज्य अध्यक्ष श्रीकांत यशवंत यमगर यांच्या नियोजनामार्फत गुरुवार दि.९ रोजी पत्रकारांचा सन्मान सोहळा पार पडला. पहिले मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्रभाऊ चंडाळे, अमोल पाटील, बापूसाहेब सोनवणे, माधुरीताई वसगडेकर, रामदास पाटील, दत्तात्रय कदम, विक्रम पाटील हे उपस्थित होते तर प्रमुख म्हणून द journalist असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद पानसरे, राष्ट्रीय महासचिव सुनील यादव, राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, महाराष्ट्र प्रदेशाअध्यक्ष डॉ. रामदासभाऊ व पुणे जिल्हाअध्यक्ष मोजेस दास यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र प्रदेशाअध्यक्ष डॉ. रामदासभाऊ ताटे साहेब, पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत यमगर यांच्यावतीने पदनियुक्ती व सन्मानचिन्ह देण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष डॉ. रामदासभाऊ ताठे यांनी संघटना वाढवण्यासाठी प्रेरणा दिल्या. पुढे बोलताना ते म्हणाले….

हा कार्यक्रम बुधगाव इंजिनिअरिंग कॉलेज जवळील हॉलमध्ये करण्यात आला.यावेळी मान्यवरांचा सत्कार शाल व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी सांगली, सोलापूर नांदेड या जिल्ह्यातिल तसेच सांगली, मिरज, कुपवाड, बुधगाव, बिसुरमधील पत्रकार आदी उपस्थित होते.