
कुपवाड ता.१० : जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार, कुपवडचे सुपुत्र कै.शरद पाटील सर यांची आज ८१ वी जयंती कुपवाड शहर सघर्ष समितीच्या वतीने नागराज चौकात साजरी करण्यात आली.
कै.शरद पाटील सर यांच्या प्रतिमेचे पूजन मा.बाळासाहेब मंगसुळे, सन्मती गौंडाजे सर यांच्या हस्ते करण्यात आले. कै. शरद पाटील सरांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई, जयहिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष चंदनदादा चव्हाण, माजी नगरसेवक शेडजी मोहिते, गजानन मगदूम, कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक दिपक भांडवलकर यांनी या कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट देऊन अभिवादन केले.
यावेळी कुपवाड शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोतरे, संजय पाटील, प्रकाश व्हनकडे, अनिल कवठेकर, राजेंद्र पवार, समीर मुजावर, अमोल कदम, बिरु आस्की, शाम भाट, सतीश पाटील, मनोज आदाटे व नागरिक उपस्थित होते.