
माधवनगर ता.१० : येथे स्वराज रिक्षा संघटनेचा आज तिसरा वर्धापनदिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. यावेळी स्वराज्य रिक्षा संघटनाचे संपर्क कार्यालयाचे ही उद्घाटन करण्यात आले. शंकर अण्णा देवकुळे, शशिकांत शिंदे साहेब, दीपकदादा चव्हाण, सरफराज सनदी, शरद सातपुते, विजय पाटील, असिफ मुरसल, दिपक कांबळे या प्रमुख नवलौकिक पत्रकारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.



तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राच्या रणरागिणी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती ताई देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष श्री पद्माकर जगदाळे सर, जय हिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री चंदन दादा चव्हाण, माजी नगरसेवक व आरोग्य दूत श्री आयुब भाई बारगीर, युवा उद्योजक श्री उदय भडेकर, सांगली जिल्हा टॅक्सी, मॅक्सी कॅब पंचायतचे उपाध्यक्ष श्री उदयसिंह घोरपडे, जय हिंद वाहन प्रतिनिधीचे सर्व पदाधिकारी यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आले.

तसेच स्वराज्य संघटनेचे सांगली मिरज कुपवाड शहरातील पदाधिकारी व रिक्षाचालकांसह आष्टा, कासेगाव, इस्लामपूर, विटा, आटपाडी, जत येथील पदाधिकारी व रिक्षा चालक उपस्थित होते.*