
सांगली ता.१४ : जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त यांना कामगारांच्या विविध प्रश्नावरती निवेदन आज (ता.१३) देण्यात आले. या निवेदनात बांधकाम कामगारांचे नोंदणी व ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात यावे तसेच माजी कामगार मंत्री आमदार श्री सुरेशभाऊ खाडे यांनी बांधकाम कामगारांना दिपवाली बोनस प्रत्येकी कामगाराला पाच हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. माजी मंत्रीनी तसा प्रस्तावही मांडला होता परंतु अजूनही बांधकाम कामगारांच्या खात्यात दीपावलीचा बोनस जमा झालेला नाही. यावर तात्काळ लक्ष घालून बांधकाम कामगारांच्या खात्यात दीपावली बोनस जमा करावा. बांधकाम कामगारांना गृह उपयोगी संच आज दर्जाहीन येत असून त्यामध्ये मटरेल देखील कमी असते तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्ट दारावर कारवाई करण्यात यावी.

यावेळी निवेदन अनुप वाडेकर (कामगार नेते), श्री विजय माळी (मिरज कामगार मोर्चा अध्यक्ष), मजीद शेख (का. मो. संयोजक तासगाव), शकील मुलाणी कडेगांव संयोजक, आम्रपाली कांबळे, माधूरी वसगडेकर भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष यांच्या वतीने देण्यात आले.
