
सांगली ता.१४ : सांगली जिल्हा खादी ग्राम उद्योग सांगली यांना आज(ता.१३) निवेदन देण्यात आले. परंपरागत व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या हाती काम मिळावे यासाठी जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ कधी मिळणार? जवळ जवळ सव्वावर्ष होत आलं अजून योजना सूरळीत सूरू नाही. तसेच लोकांना त्या योजनेनुसार ट्रेनिंग घेण्यात आले नाही त्यामुळे त्यात अधिकारी सो आपण लक्ष घालून अंबालबजावणी करावी. कष्टकरी कामगार, मजूर यांना लाभ देण्याकरिता अर्ज मंजूर करण्यात यावेत. ज्या लाभार्थीत्यांचे ट्रेनिंग झाले आहे त्यांना टूल किट अजून मिळाले नाही. ट्रेनिंग भत्ता देण्यात आला नाही व कर्ज देताना बैकाचे निकश त्यामुळे कर्ज मंजूर करताना लाभार्थ्यांना अडचण निर्माण होत आहे तरी आपण लक्ष घालून पाठपुरावा करावा असे निवेदन सांगली जिल्हा खादी ग्रामोद्योग यांना देण्यात आले.
यावेळी अनुप वाडेकर (कामगार नेते), विजय माळी (मिरज तालुका कामगार मोर्चा अध्यक्ष तथा संयोजक), मजीद शेख (का. मो. संयोजक तासगाव तालूका), शकील मुलाणी (कडेगांव संयोजक) आम्रपाली कांबळे (सचिव प.महा सचिव भाजपा का.मो), माधूरी वसगडेकर भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष आदी उपस्थित होते.
