
कोल्हापूर ता.१५ : कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय बैठकीत बँकेच्या विविध विभागांच्या व्यवस्थापक व उपव्यवस्थापक पदांवर २५ अधिकाऱ्यांना बढत्यांच्या नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. या बढत्या झाल्याने आता जवाबदारी वाढलेल्या आहेत त्या जबाबदारीचे भान ठेवा. बँकेत ठेवी वाढविण्यासाठी व कर्ज वसुलीसाठी तत्पर राहा. क्यू आर.कोड वितरणाची मोहीम अधिक गतीने राबवा.
स्पर्धेच्या या काळात प्रत्येक घटकाला सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण काम दाखवून सहकाऱ्यांशी समन्वय ठेवून संघटितपणे काम करा. असे निर्देश सर्व बॅंकेतील अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग यांना देण्यात आले.
यावेळी माजी खासदार डॉ.श्रीमती निवेदिता माने,प्रताप उर्फ भैय्या माने,बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर,संतोष पाटील,सुधीर देसाई,रणवीरसिंग गायकवाड,राजेश पाटील,विजयसिंह माने,सौ.श्रुतिका काटकर,सौ.स्मिता गवळी,आय.बी.मुन्शी,दिलीप लोखंडे आदी संचालक व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे उपस्थित होते.