कुपवाड : प्रतिनिधी

कुपवाड ता.१९ : उमेद ग्रुपच्या संचालिका व उमेद ग्रुपचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय मूलचंदजी मालू यांच्या पत्नी सुदाकुंवर मूलचंदची मालू यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९५ वर्षी दुःखद निधन त्यांचे राहते घरी झाले.
कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू यांच्या त्या आजी आहेत. उठावना विधी दिनांक 20 रोजी उमेद एम्पयर माधवनगर येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यांच्या निधनाने मालू कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, पुतणे, चार मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.