कुपवाड : प्रतिनिधी

कुपवाड ता. १९ : सांगली जिल्हा कुरूहीनशेट्टी कोष्टी समाजाच्या जागेच्या नामफलक अनावरण सोहळा आमदार डॉ.सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले की; सांगली जिल्हा कुरूहीनशेट्टी कोष्टी समाज हा लोकसंख्येने जरी अत्यल्प असला तरीही या समाजाच संघटन सशक्त आहे. कार्याची व कार्यकर्त्यांची भरभक्कम अशी फळी आहे. त्यामुळेच कुपवाड येथे समाजाच्या मालकीची ५० लाख रुपये किंमतीचा ६ हजार ५०० स्क्वेअर फुटाचा भूखंड खरेदी करू शकला ही गोष्ट निश्चितच प्रेरणादायी असून हा आदर्श सर्व समाजाने घ्यावा असे आवाहन सुरेश खाडे यांच्याकडून करण्यात आले.

यावेळी सांगली जिल्हा कोष्टी समाजाचे अध्यक्ष बापूसाहेब कोष्टी, महाराष्ट्र राज्य कोष्टी समाज सचिव सुनील कोष्टी, डॉ.चंद्रशेखर हळीगळी, महाराष्ट्र राज्य कोष्टी समाज उपाध्यक्ष धैर्यशील सुपले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य कोष्टी समाजाचे अध्यक्ष प्रभाकर इजारे, उपाध्यक्ष – धैर्यशील सुपले, सचिव सुनील कोष्टी, कोषाध्यक्ष – गजानन सुपले, सुरेश गारे, कल्लाप्पा हळीगळे, मधुकर कोष्टी, अशोक कोष्टी, मल्लिकार्जुन कोष्टी, डॉ म्हेत्रे, राम म्हेत्रे, दत्तात्रय बोरिगिड्डे, शीतल बिडकर, निर्मला कोष्टी व प्रमोद अथनीकर यावेळी उपस्थित होते.