कुपवाड : प्रतीनिधी

कुपवाड , ता.१९ : औद्योगिक वसाहतीतील स्वीट कॉन्फेशनरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या चॉकलेट कंपनीच्या पेपर कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना शनिवार (ता.१८) रोजी रात्रीचा सुमारास घडली. अग्निशमन दलास माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या पेपरला व साहित्याला आग लागली. बघता बघता काही क्षणातच आग भडकली. या आगीचे लोट दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतुन बाहेर येताना दिसत होते. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न केले. ही आग विझवण्यास रविवार सकाळी अग्निशमन दलाला यश आले. या भीषण आगीत कारखान्यातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेची नोंद रविवारी रात्री उशिरापर्यंत कुपवाडच्या पोलिस ठाण्यामध्ये झाली न्हवती. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही पण विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ती लागली असावी अशी चर्चा परिसरात सुरू होती.