
कुपवाड : प्रतिनिधी

कुपवाड, ता.२० : उद्योगामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी “अंतर्गत तक्रार समिती” गठीत करणेबाबत सहा. कामगार आयुक्त मु.अ. मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग पार पडली. यावेळी संस्थेचे संचालक रमेश आरवाडे, पांडुरंग रुपनर, मिरज असो. उपाध्यक्ष हर्षल खरे, सहसचिव अतुल पाटील, महिला बालकल्याण अधिकारी संजय चौगले, जयदीप पाटील उपस्थित होते.

