
कुपवाड ता.३ : येथील मिरज तासगाव रोड, तानंग फाटा येथे जनावरे कत्तलीसाठी नेणारी बेकायदेशीर दोन मालवाहतूक कुपवाड पोलिसांनी पकडले. चन्नपा पांडुरंग कोकरे, वय 47 वर्ष, रा. बोरगाव, ता. वाळवा, जि. सांगली याच्याकडील मालवाहतूक गाडी क्रं- MH-10-Z 4859 हा असून या गाडीमध्ये पाच संकरीत गायी कैद होत्या तर चालक सागर जालिंदर पाटोळे, वय 23 वर्ष, रा. वेजेगाव ता.खानापूर, जि. सांगली याच्याकडील मालवाहतूक गाडी क्र-MH-04 JK 4872 हा असून या गाडीत तीन मोठ्या गायी व दोन लहान गायीचे पाडसे आणि म्हशीचे रेडकू कैद होते. दोन्ही मालवाहतूकित एकूण अकरा जनावरे कैद होते. जनावरांना चारा पाणी न देता दोरखंडाने बांधून ठेवले होते. पोलिसांनी जनावरांची सुटका करून विना परवाना बेकायदेशीर जनावरे वाहतूक करणाऱ्या दोघां चालकाविरुध्द प्राण्यांचा छळ व महाराष्ट्र पशु संरक्षण कायदेअंतर्गत कुपवाड पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला. सदर घटनेचा अधिक तपास कुपवाड पोलिस करत आहे.