कुपवाड : प्रतिनिधी

कुपवाड ता.४ : औधोगिक वसाहतीत उधोजकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना मंगळवार (ता.४) सकाळी अकरा ते तीन दरम्यान घडली आहे. गळफास लावून घेतलेल्या उधोजकाचे नाव बाळसिंग प्रताप सिंग रजपूत वय ५८ वर्षे राहणार सत्यसाई नगर, वारणाली विश्रामबाग, सांगली असे असून त्यांनी कुपवाड एमआयडीसी प्लॉट नंबर M५/३ येथील सुदर्शन इंजिनीयर कंपनीत सिमेंट पत्र्याच्या रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटनेची कुपवाड पोलिसांत नोंद झाली असून याबाबत प्रतीक उदयसिंग रजपूत, वय २८ वर्षे, व्यवसाय व्यापार, रा. प्रताप इंडस्ट्रीज प्लॉट नंबर एन १६/A/१ एमआयडीसी कुपवाड यांनी कुपवाड पोलिसांत फिर्याद दिली.
अधिक माहिती अशी की, उद्योजक बाळसिंग रजपूत यांची कुपवाड औद्योगिक वसाहतीत सुदर्शन इंजिनिअर अशा नावाने कंपनी आहे. आज मंगळवार (ता.4) रोजी कंपनी बंद असताना रजपूत सकाळी अकरा वाजता कंपनीत आले होते. रजपूत यांनी कंपनीच्या पाठीमागील सिमेंट पत्र्याच्या खोलीत लोखंडी ॲगलला दोरीच्या सहायाने गळफास घेतला. घटना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. सदर घटनेचा अधिक तपास करीत आहेत.