कुपवाड : प्रतिनिधी

सांगली ता.८ : माधवनगर येथील गोल्डन बेल्स प्रीस्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उस्ताहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी अँड हरीश प्रताप उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापिका आरती जाजू, विध्यार्थ्याचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जयंती, नारळी पौर्णिमा, , गोपाळकाला, देशभक्तिपर गीते, बालगीते, आदी गीतांवर वैयक्तिक व सामूहिक नृत्य सादर करून उपस्थित पालकांची मने जिंकली. तसेच वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यामध्ये अँड हरीश प्रताप यांनी विध्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.

वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा पार पडण्यासाठी मुख्याध्यापिका आरती जाजू, शिक्षक सुदर्शन जाजू, पूनम माळी, प्राजक्ता शिंदे, नेहा मालू, शीतल यांनी खूप परिश्रम घेतले. सदरचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडल्यामुळे पालकांनी शाळेतील सर्व शिक्षकाचे कौतुक केले.