मिरज : प्रतिनिधी

मिरज ता.८: मिशन (वान्लेस) हॉस्पिटलचे डायरेक्टर तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ईशान्य भारत प्रभारी, राष्ट्रीय सचिव मा. विनोद भाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांना वही, पेन, पाण्याची बाटली आणि खाऊ वाटप करण्यात आला. मा. नानासाहेब वाघमारे महाराष्ट्र उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत बेळंकी येथील विकासनगर येथे पार पडला.
कार्यक्रमाप्रसंगी बेळंकी आणि विकासनगर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वह्या, पेन, पाण्याची बाटली आणि खाऊ वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करुन मिशन मॅन मा. विनोद निकाळजे साहेब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा, विकासनगर (बेळंकी) ता.मिरज पाटील या शाळेतील १०० विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना प्रत्येकी ३ याप्रमाणे ३०० वह्यांचे वाटप करण्यात आले. तर २ पेन, १ पाण्याची बाटली आणि खाऊ वाटप करण्यात आले.
व्यासपीठावर वही वाटप उपक्रमाचे आयोजकांसमवेत राष्ट्रीय अन्न निवारण चे महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत कांबळे, राष्ट्रीय अन्न निवारण चे महाराष्ट्र उपाध्यक्ष संदीप घोलप, तानाजी कोरे (ग्रा. पं. सदस्य,बेळंकी) रिपाई (आठवले गट) कवठेमहांकाळचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ वाघमारे, लहू कोरे (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन, जि. प. शाळा, विकासनगर), विशाल माने (अध्यक्ष, रिपाई आठवले गट, कवठेमहांकाळ), सागर आवळे (सामाजिक कार्यकर्ते, मिरज), राज बाबर (सामाजिक कार्यकर्ते, विटा), अंकुश भोरे (सामाजिक कार्यकर्ते, मिरज), रोहन कांबळे (भारती हॉस्पिटल स्टापनर, सांगली), प्रवीण आवळे (भारती हॉस्पिटल स्टापनर, सांगली) रोहित कांबळे (मेडिकल ऑफिसर, कतार) आदी मान्यवर उपस्थित होते तर लहू कोरे (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन, जि. प. शाळा, विकासनगर), तसेच संपूर्ण शाळेत शिक्षक शिक्षिका यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन मेजर निरंजन माने, धनराज कांबळे (नेते, रिपाई (आठवले गट, मिरज), योगेश काटे (सामाजिक कार्यकर्ते, सावळज) आणि जयंत मगरे यांनी केले.