
कुपवाड : प्रतिनिधी
कुपवाड ता.२६ : येथील तासगाव-तानंग रोडवर दोन टेम्पोची समोरासमोर धडक झाल्याने टेम्पोतील चार महिला जखमी झाल्याची घटना सोमवार, ता.२४ रोजी तासगांव-तानंग रोडवर घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित टेम्पो चालक सुशांत शिवाजी कदम वय २४, भिलवडी स्टेशनजवळ, भिलवडी याच्यावर कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. यात जखमी झालेल्या महिला शकुंतला कुमार कांबळे, सुजाता संजय कृष्णले, शोभा अशोक मांग, तिघेही रा. मालेगाव रोड मिरज, तसेच अनिता दिपक आलगुडे, रा. म्हाडा कॉलनी, रमा उधान जवळ, मिरज असे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील एक टेम्पो (एमएच १०, सीआर २४१४) चार महिलांना घेऊन मिरजेहून तासगावकडे जात होता. यावेळी तासगाव मार्गालगत एका कंपनीसमोर तासगावहून मिरजेकडे भरधाव जाणाऱ्या टेम्पोचालकाने (एमएच १० डीटी २५४२) जोराची धडक दिली. या धडकेत टेम्पोमध्ये बसलेल्या चारही महिला जखमी झाल्या. याबाबत जखमी शकुंतला कांबळे यांनी टेम्पोचालक संशयित सुशांत कदम याच्या विरोधात कुपवाड पोलिसांत तक्रार दाखल केली.