
कुपवाड , ता२६ : परिसरातील एका महिलेचा विनयभंग करून मारहान केल्याची घटना रविवारी घडली आहे. याबाबत कुपवाड पोलीसांत (ता.२५) रोजी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केलेल्या संशयित आरोपीचे नावे विजेंद्र राजू यादव, अजिंक्य अनंत शिंदे, आरती अनंत शिंदे अशी आहेत. याबाबतची फिर्याद संबंधित पीडित महिलेने दिली. त्यानुसार संशयित विजेंद्र व अजिंक्य दोघांनी गैरवर्तन करत महिलेचा विनयभंग केला. त्यानंतर मारहाणही केली. मारहाणीत संशयित आरतीसह दोघांचा सहभाग होता. यात पीडितेसह तिची आई व पती असे तिघेही जखमी झाले. घटनेची फिर्याद त्यांनी कुपवाड पोलिसांत दिली.