
कुपवाड : प्रतिनिधी
कुपवाड , ता.२८ : येथील अहिल्यानगर परिसरात युवकावर धारधार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला. या हल्यात दिपक हेमंत जाधव (वय २७ सध्या रा. रामकृष्णनगर, कुपवाड ता. मिरज, जि. सांगली) जखमी झाला आहे. सदर घटना गुरुवारी (ता. २७) घडली असून या घटनेची फिर्याद जखमी दिपकने कुपवाड पोलीसांत शुक्रवारी (ता.२८) रोजी दिली आहे. याप्रकरणी रमजान मौला शेख, शब्बीर मौला शेख सौरभ जावीर, अर्जुन गेजगे (सर्वच रा. प्रकाशनगर, कुपवाड) अशा चौघां संशयितांवर कुपवाड पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , गुरुवार (ता.२७) रोजी रात्री संशयितांनी आपापसात संगणमत करून कृत्य केले. दिपक यावर धारधार शस्त्राने हल्ला चढवला. हल्ल्यात तो जखमी झाला. वैद्यकीय उपचाराकरिता त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची फिर्याद त्याने शुक्रवार (ता. 28) रोजी कुपवाड पोलिसांत दिली. दिलेल्या फिर्यादीवरून चौघा संशयितांना ताब्यात घेतले व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अंतर्गत जुन्या भांडणातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले. अधिक तपास पोलिस करीत आहेत.