कुपवाड : प्रतिनिधी

कुपवाड , ता.५ : औद्योगिक कारखान्यामध्ये काम करताना आपघात होऊन कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार (ता.५) सायंकाळी घडली. या आपघातात मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव शिवराय नागाप्पा कटीमन्नी (वय ५१ सध्या रा. बामणोली ता.मिरज मूळगाव : कन्नर अथणी, जि. बेळगाव) असे आहे. या घटनेची नोंद कुपवाड पोलीसांत झाली आहे.
पोलिसांची अधिक माहिती अशी की, मयत कटीमन्नी सावळी (ता.मिरज) येथील वेस्टर्न प्रा. लि कारखान्यात औद्योगिक कारखान्यात कामास होता. बुधवार (ता.५) रोजी सायंकाळी काम करत असताना लोखंडी जॉबचा लोअड त्यांच्या अंगावर पडून ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ खाजगी वाहनाने भारती हॉस्पिटलमध्ये नेले असता उपचारापूर्वी वैद्यांनी कटीमन्नी यांना मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनेची नोंद कुपवाड पोलिसांत करण्यात आली.