कुपवाड : प्रतिनिधी

कुपवाड , ता.५ : कुपवाड-मिरज रोडवरील शेतात एका २७ वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या. आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव महेश कल्लाप्पा कोष्टी (वय २७ रा. लिंगायत गल्लीचा परिसर, कुपवाड) असे आहे. सदर घटना बुधवार (ता.५) घडली असून या घटनेची नोंद कुपवाड पोलीसांत झाली आहे.
पोलिसांची अधिक माहिती अशी की, महेश बुधवारी (ता.५) रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास कुपवाड-मिरज रस्त्यावरील शेतात विषारी औषध पिऊन मयत आढळला. त्यास हर्षद पाटील यांनी सव्वा अकराच्या दरम्यान मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यांनी महेश यास मयत घोषित केले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसून याबाबत अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.