बामणोली : प्रतिनिधी

दत्तनगर , ता.४ : मिरज तालुक्यातील बामणोली दत्तनगर येथील दत्तमंदिरात महाकुंभ प्रयागराज त्रिवेणीसंगम येथील तीर्थ जलकलशचे आगमन मंगळवार (ता.४) सकाळी नऊ वाजता झाले. या जलकलशचे पूजन दत्तनगरमधील सात दाम्पत्यांचे हस्ते करण्यात आले. जलकलशचि महाआरती दुपारी बारा वाजता कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिपक भांडवलकर यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी गावातील अनेक नागरिकांनी या जल कलशचे दर्शन घेतले व नागरिकांनी जलतीर्थचे प्राशन केले.

अनुलोम संस्थेमार्फत प्रयागराज येथे सुरू असलेल्या महा कुंभमेळ्यातून गंगाजलचे पवित्र तीर्थाच्या कलशाचे दर्शन व पूजनासाठी बामणोली, दत्तनगरमधील मंदिरात अनुलोमच्या वतीने ठेवण्यात आला. कुंभ मेळ्याव्यातील माहिती दत्तमंदिरात देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे बामणोली ग्रामपंचायत उपसरपंच विष्णू लवटे, माजी सरपंच व विधमान सदस्य राजेश संनोळी, सुमित यमगर तंटामुक्त उपअध्यक्ष, बी. एस.
सुतार, सुवास चव्हाण व गावातील सामाजिक कार्यकर्ते आदीने केले.