
बीड , ता.९ : जागतिक महिला दिनी काळिमा फासणारी गोष्ट घडली. एका पोलिस कर्मचाऱ्याने महिलेला कार्यक्रमास बोलवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
अधिक माहिती अशी की, पाटोदा पोलीस ठाण्याचे बीट अमलदार उद्धव गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलावले, पाटोदा येथील स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात नेले. नंतर या पोलिसानेच महिलेवर बलात्कार केला.
या प्रकरणी महिलेने धाडस करुन पाटोदा पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आणि बीट अमलदार उद्धव गडकर याच्या विरोधात तक्रार केली.