कुपवाड : प्रतिनिधी

कुपवाड , ता. १०: औधोगिक वसाहतीत चाकण सब स्टेशन मध्ये असलेल्या 10+5 MVA सब स्टेशन मध्ये नवीन 5 MVA चा वाढवून १० MVA ची एकूण 20MVA Capacity ची उभारणी करण्यात आलेली आहे.
तर वाढीव पॉवर ट्रान्सफॉर्मर चे उद्घाटन महावितरणच्या स्वतंत्र संचालिका सौ. निताताई श्रीरंग केळकर यांच्या हस्ते बुधवार दिनांक १२ मार्च २०२५ रोजी दुपारी ठीक १२.०० वाजता होणार आहे. तरी सदर उद्घाटन कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
यावेळी महावितरण ऑफिस चे अधिक्षक अभियंता श्री. एस. एस. सवाईराम, कार्यकारी अभियंता श्री. आप्पासाहेब खांडेकर, अति. कार्यकारी अभियंता श्री. अनंत उपरे, सहा. अभियंता श्री. आश्विनकुमार बुचडे. हे उपस्थित राहणार आहेत. सदर माहिती कृष्णा व्हॅली चेंबर अध्यक्ष सतीश मालू यांनी दिलेली आहे.