
खटाव , ता.१४ : मिरज तालुक्यातील खटाव गावात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शुक्रवार (ता.१४) घडली.
तर ही हाणामारी रंग लावण्याच्या कारणावरून नाईक व वाघावकर या दोन गटांमध्ये झाली. या हाणामारीत दोघेजण किरकोळ जखमी.
याप्रकरणी मिळाली माहिती अधिक अशी की, खटाव गावात आज (ता.१४) रंग लावण्याच्या कारणावरून महेश वाघावकर व दर्शन नाईक यांच्यात किरकोळ वादावादी झाली होते. तो वाद स्थानिक पातळीवर मिटवण्यात आला होता परंतु आज दुपारी पुन्हा वाघावकर गटांकडून कवठेमंकाळ येथील काही पोरांना बोलवून घेऊन पुन्हा नाईक यांच्या घरावर पुन्हा हल्ला करण्यात आला. दर्शन नाईक, सुशीला नाईक, अविनाश नाईक यांना घरात घुसून मारहाण करण्यात आल्यान पुन्हा नाईक व वागावकर या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय सुनील गुरव व बीटअमलदार संदीप शिंदे घटनास्थळी भेट देऊन वातावरण शांत करण्यात आले.
याप्रकरणी दोन्ही गटाचे मिरज पोलीस ठाण्याकडे धाव घेतली आहे. पोलिसांचा बंदोबस्त असून अधिक तपास बीट अंमलदार संदीप शिंदे अधिक तपास करत आहेत.