
शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी त्यांच्या निवासस्थानातून घेतले ताब्यात. शक्तीपीठ महामार्गला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. मात्र तरीही प्रशासनाकडून या मार्गाच्या कामासंबंधी हालचाली वाढल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आज सांगली-कोल्हापूर मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार होते. परंतु या आंदोलनाआधीच पोलीस प्रशासनाने राजू शेट्टी यांना त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतलं