कुपवाड : प्रतिनिधी

कुपवाड , ता.१८ : सह्याद्री स्टार्चमधील कमी केलेल्या माथाडी कामगारांना कामावरती घेण्यासाठी मिरज औद्योगिक वसाहतीतील सह्याद्री स्टार्च कारखान्याच्या आवारात कामगारांनी मंगळवारी (ता.१८) ठिय्या आंदोलन केले.
उच्च न्यायालयाकडून प्राप्त झालेले निर्देश दर्शवित जोरदार घोषणाबाजी केली. कारखान्याच्या व्यवस्थापनासह भर उन्हात दोन ते अडीच त्यांचा रुजवाद सुरू होता. माहिती मिळताच जिल्हा माथाडी मंडळाचे निरीक्षक विजय सावंत यांनी कारखान्याला भेट दिली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत कायदेशीर मार्गाचा अवलंब करून तोडगा काढा. असा सल्ला दिला. माथाडी कामगारांचे नेते हरिदास लेंगरे यांनी निरीक्षक सावंत यांच्या मध्यस्थीने येत्या चार दिवसांत बैठक होणार असल्याचे सांगितले.
हरिदास लेंगरे म्हणाले, सह्याद्री स्टार्च कारखान्यातून कमी केलेल्या बत्तीस कामगारांना कामावर घ्या. असा निर्देश उच्च न्यायालयाने दिला होता. त्याअनुषंगाने आम्ही कारखान्यावर मोर्चा काढला. भर उन्हात ठिय्या आंदोलन केले. सुरवातीला कारखाना व्यवस्थापनाने उडवा-उडवीची उत्तरे देत आम्हाला जुमानलेच नाही.
माहिती मिळताच जिल्हा माथाडी मंडळाचे निरीक्षक विजय सावंत घटनास्थळी दाखल झाले. आमचे व कारखाना व्यवस्थापकांचे म्हणणे सविस्तररित्या ऐकून घेतले. कायदेशीर पध्दतीने मार्ग काढा असा सल्लाही दिला. त्यानंतर मात्र सकारात्मक चर्चा झाली. चार दिवसात बैठकीचा तोडगा काढण्यात आला आहे.
मगच आम्ही आंदोलना स्थगित केले. पण आमचा लढा संपला नाही. योग्य निर्णय न झाल्यास उग्र तीव्र आंदोलन करू.माथाडी कामगारांचे नेते हरिदास लेंगरे, प्रकाश टिळे, राहुल दुधाळ, पांडुरंग सरगर, विलास काळे, सुरेश घाडगे, दिलीप मुडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीने प्रश्न सोडवू त्यासाठी या कल्पना आम्हाला कोणीही दिली नाही. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिलेला निर्णय मान्य नसल्यास तुम्ही आमच्याकडे याचिका दाखल करा. हा पर्याय आम्हास उच्च न्यायालयानेच दिला आहे. त्याचे पालन करून आम्ही न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. त्याबद्दल काम सुरू आहे.
