
मिरज , ता.२१ : सांगली जिल्ह्य़ातील पुरोगामी विविध संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱी यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात त्यांनी या मागण्या केलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे…..
नागपुर दंगल प्रश्नी नैतिकता स्विकारून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री व मुख्यमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा.
- अन्यथा राष्ट्रपतींकडून हे सरकार बरखास्त करावे.
- हि नागपूर दंगल सरकार पुरस्कृत आहे,
मराठ्यांच्या शौर्यचं प्रतिक ती औरंग्याची कबर आहे. - आर. एस. एस, बजरंग दल, विश्वहिंदु परिषदे वर तात्काळ बंदी घालण्यात यावी.
- या राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित प्रश्न निर्माण आहेत.
- शेतकर्यांचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, महागाई चा प्रश्न, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रश्न या कडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
असा आरोप प्रा,प्रमोद इनामदार सर यांनी केला. त्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्रा,प्रमोद इनामदार सर, माळी महासंघाचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष श्री.गंगाधर तोडकर, रिपब्लिकन पक्षाचे श्री.परसराम कांबळे, गौतम कांबळे, बेरड महासंघाचे चंदु नाईक उपस्थित होते.