
कुपवाड : आज कुपवाड शहरात बदलापूर व कोल्हापुरात झालेला अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेच्या निषेर्धात महाविकास आघाडी व सांगली जिल्हा इंडिया आघाडी आणि संवेदनशील कुपवाडकर यांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हाताला काळी रेबिन बांधून निषेध दर्शवत हा मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चामध्ये शाळकरी मुला मुलींनी ही सहभाग घेतला. हा मूक मोर्चा अत्यंत शांततेत व वाहतुकीला कोणतीही अडचण न येता पोलिसांच्या देखरेखित व्यवस्थित पार पडला.
याावेळी सनी धोतरे, शेडजी मोहिते, समीर मुजावर, आयनुदिन मुजावर, तानाजी गडदे, कृष्णा कोकरे, पंकज धोतरे, सागर खोत, सुरेश साखळकर, अरुण रुपनर, विठ्ठल सपकाळ,दिलीप धोतरे, कासम मुल्ला आदी समाजसेवक उपस्थिती होते.