
सांगली : दि. 24/08/2024 बदलापूर व कोल्हापूरातील घटना ताजी असतानाच सांगलीत संजयनगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली.
काल रात्री साडेनऊच्या सुमारास संशयित आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिग अत्याचार करून ह्या घटनेची कुठे वाच्छता केलीस तर बग अशी धमकी त्या पिडीतीला दिली. ही घटना पिडीतिने तिच्या आईस आज सकाळी सांगितली. या घटनेची तक्रार करण्यासाठी पिडीत व तिची आईने संजयनगर पोलीस ठाण्यात दुपारी पावणेबाराच्या सुमारास तक्रार दिली. दिलेल्या फिर्यादी वरून संशयितच्या शोधनास संजयनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके रवाना करून आरोपीला तक्रार दिल्यापासून दीड तासात अटक केले.
अटक केलेल्या आरोपी नाव संजय प्रकाश माने वय 30 असे असून तो अत्याचार केलेल्या पिडितीच्या शेजारीच आहे. पिडीत बलिकेस वैधकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले .
सदर घटनेचा अधिक तपास संजय नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे हे करित आहेत.